पैशांच्या वादातून जन्मदात्या आई-वडिलांवर केला हवेत गोळीबार

shot from a handgun with fire and smoke

। उरण । वार्ताहर ।
न्हावा गावातील मुलाने साडेबारा टक्के पैशाच्या व घराच्या वादातून स्वतःच्या जन्मदात्या आई, वडिलांवर हवेत गोळीबार करण्याची घटना गुरुवारी (दि.22 जुलै) न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

न्हावा गावातील रहिवासी असणार्‍या विक्रांत भोईर याने आपली आई वासंती भोईर (वय 46) व वडील जयवंत भोईर यांच्याकडे घरासाठी खर्च केलेल्या पैशांची व साडेबारा टक्के पैशाच्या केलेल्या मागणीतून वाद निर्माण झाला. या वादात विक्रांत भोईर याने त्याच्या आई-वडिलांना धमकावण्यासाठी गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास हवेत गोळीबार केला.

या प्रकरणी आरोपी विक्रांत भोईर याच्याविरोधात त्याच्या आईवडीलांनी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भेट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस अटक करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Exit mobile version