| उरण | वार्ताहर |
उरण परिसरातील तरुणांना नोकर्या लावतो असे सांगून त्यांच्या कडून पैसे घेतल्या प्रकरणी पाणजे गावातील मनिष भोईर यांच्या विरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक मंगेश कनवाड यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार पाणजे गावातील मनिष भोईर हा इसम परिसरातील तरुणांना नोकर्या लावतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत होता. या प्रकरणी तरुणांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. न्हावा शेवा पोलीस ठाण्यात मनिष भोईर यांच्या विरोधात 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत असून पोलीस मनिष भोईर यांचा शोध घेत आहेत. तरी तरुणांनी अशा प्रकारच्या इसमाच्या भुलतापाना बळी पडू नये असे आवाहन न्हावा शेवा पोलीस अधिकारी वर्गाकडून करण्यात येत आहे.