। पनवेल । वार्ताहर ।
भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्य हद्दीत घडली. या प्रकरणी कारचालक शत्रुघ्न जयस्वाल याच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुरलीधर घुगे हे कळंबोली येथे राहतात. ते त्यांच्या दुचाकीने जात असताना त्यांनी संजय लाड याला मोटारसायकल चालवायला दिली ते शालिमार ढाब्यासमोरील रोडवर पोहोचले असता कारचालकाने अचानक त्याची कार वळवल्याने कार या दोघांच्या पायावर आदळली व हे दोघे दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यांना रुग्णालयात नेले असता दोघांच्या पायाला फ्रैक्चर झाल्याचे सांगितले.







