Accident: भरधाव टँकरची कारला धडक

| रसायनी | प्रतिनिधी |

नवीन पनवेल येथे भरधाव टँकरने कारला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात कारचे नुकसान झाले असून, टँकरचालक अवधेश कुमार रामसंबध मिश्रा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडिवली रसायनी येथील कृष्णा वाघे हे आपल्या कारने नवीन पनवेल येथील डी मार्ट या ठिकाणी जात होते. यावेळी भरधाव टँकर चालकाने मद्य प्राशन करून कृष्णा वाघे यांच्या कारला पाठीमागून उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. यावेळी कारच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील दार चेपले गेले. तसेच, पाठीमागील उजव्या बाजूचे टायर देखील फुटला आणि मडगार्ड तुटून नुकसान झाले. त्यामुळे कृष्णा वाघे यांच्या कारचे प्रचंड प्रमाणात नुकसाना झाले असून, टँकर चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version