। तळा । वार्ताहर ।
पत्रकार देवयानी मोरे यांना नगराध्यक्षांच्या पतीकडून आलेल्या धमकीच्या फोनप्रकरणी तळा तालुक्यातील पत्रकारांतर्फे तळा पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. खुद्द नगराध्यक्षा यांच्या गावातच कुत्र्यांनी वासरावर हल्ला केल्यामुळे त्याची बातमी एका न्यूज चॅनेलने प्रसारित केली असता नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी संपादिका देवयानी मोरे यांना फोन करून नगराध्यक्षांच्या विरोधातली बातमी का लावलीस, पुन्हा विरोधातली बातमी लावली तर भांडण होतील, अशी धमकी दिली. त्यामुळे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिलेल्या समस्येचे निराकरण करण्याऐवजी त्यांना धमकी देणार्या तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या राजकारण्यांना बोलावून समज द्यावी, यासाठी बुधवारी तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्याला निवेदन दिले.
तळा पत्रकारांचे पोलिसांना निवेदन
