| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील मंगल पारखे या महिलेला मारहाण केल्याप्रकरणी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
नगरपंचायत कार्यालयासमोर मंगल पारखे या महिलेला नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर व त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांच्याकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. याबाबत तळा पोलिस ठाण्यात दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष ऍड निलेश रातवडकर यांनी केली. त्यापाठोपाठ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या गटनेत्या नेहा पांढरकामे यांनीही नागराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.