| पनवेल | वार्ताहर |
लक्ष्मीपुजनासाठी ठेवलेल्या आठ लाखांच्या सोन्याचा दागिन्यांची चोरी होण्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला.
विघ्रहर्ता सोसायटीतील जयेंद्र पाटील यांनी घराबाहेर जाताना दरवाजाला कडी- कुलूप न लावता दरवाजा फक्त ओढून बंद केला. मात्र घरात लक्ष्मीपूजनासाठी देव्हार्यासमोर ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असल्याचे ते पूर्णतः विसरून गेले. याच ऐवजावर चोरट्यांनी घरात शिरुन डल्ला मारला आणि पोबारा केला. या घटनेनंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी 2 पथके स्थापन करुन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे .