कट्टर नक्षलवाद्याला नालासोपार्‍यात अटक

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपार्‍यातून जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. हुलस यादव (45) असे नाव असून तो मुळचा झारखंडचा रहिवासी आहे. त्याच्यावर 15 लाखांचे बक्षीस होते. तो झारखंडमधून मुंबईत उपचारासाठी आला होता. मुंबईच्या नजीक नालासोपारा परिसरात तो लपून राहत होता. या संबंधित माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने आज सकाळी नालासोपाराच्या धानीव बाग आणि रामनगर भागातील चाळींवर छापे टाकले. या छाप्यात त्यांनी हुलस यादव या जहाल नक्षलवाद्याला अटक केली.

Exit mobile version