पिसाळलेल्या माकडाला प्राणिमित्रांकडून जेरबंद

। नेरळ । प्रतिनिधी ।
बारवी धरणाच्या परिसरात असलेल्या जंगलातील पिसाळलेले माकड बाजूच्या कारंद गावात ग्रामस्थांना त्रास देत होते. कारंद गावात धुमाकूळ घालणार्‍या माकडाला बदलापूर येथील रेस्क्यू टीम ने पकडून जंगलात नेवून सोडले असून त्यामुळे कारंद गावाच्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे. कारंद गावात बारवी धारांच्या आजूबाजूला असलेल्या घनदाट जंगलातील एक पिसाळलेले माकड आले होते. गेली सहा महिने या माकडाने स्थानिक ग्रामस्थांचेजगणे मुश्किल करून ठेवले होते.ग्रामस्थांच्या मागणीनंतर वन विभागाने देखील त्या पिसाळलेल्या माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न केले.मात्र ते माकड वन विभागाच्या हाती काही लागत नव्हते,त्यामुळे वन अधिकारी अनिल भामरे यांनी बदलापूर येथील रेस्क्यू टीम ला पाचारण केले. या रेस्क्यू टीमचे मनोहर मेहेर,परेश पानसरे,मनीष फुलपगारे आणि अन्य शहरी यांनी कारंद गावात जाऊन त्या पिसाळलेल्या माकडाला तीन तासांच्या प्रयासानंतर पकडले आणि पिंजर्‍यात टाकले. बदलापूर रेस्क्यू टीम च्या या कामगिरीबद्दल कारंद ग्रामस्थांनी अभिनंदन केले.पकडलेल्या माकडाला नंतर त्यांच्या अधिवासात जंगलात सोडण्यात आले.

Exit mobile version