| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील कर्जत-कल्याण भागातील नेरळ जंक्शन ते भिवपुरी रोड रेल्वे स्थानकादरम्यान मुख्य मार्गावर फाटक क्रमांक 23 आहे. या फाटकाच्या एका बाजूला चिंचवली गाव तर दुसऱ्या बाजूला कल्याण-कर्जत राज्यमार्ग आहे. या रेल्वे फाटकाला शुक्रवारी (दि.23) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिली. या धडकेत त्या फाटकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे या फाटकातील उपनगरीय आणि लांब पल्ल्याची गाडी आल्यानंतर हे फाटक बंद करता येत नव्हते. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता होती. यावेळी आरपीएफ जावे यांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून ठेवली. तर, रेल्वेच्या तांत्रिक विभागाने तात्काळ नवीन फाटक बसविले. तब्बल दोन तासानंतर हे फाटक पुन्हा सुस्थितीत करण्यात आले.