| खोपोली | वार्ताहर |
मुंबई-पुणे महामार्गावर आज सात ते आठ गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. 7 ते 8 वाहने एकमेकांवर आदळली आणि ट्रकने 2 मोटार कारना चिरडले आहे. ट्रकने दोन कारला उडवलं. यात एका अर्टीगाचा चक्काचूर तर आय 10 कार दुभाजक आणि ट्रकमध्ये अडकली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील मुंबई लेनवरील खपोली हद्दीत हा भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. जखमींवर एमजीएम हॉस्पिटल, खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. अश्विनी अक्षय हळदणकर आणि श्रेया संतोष अवताडे अशी मृत महिलांची नावे आहेत. तर 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी, हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे.