अपघात ब्रेकिंग; एक्सप्रेसवेवर दोन ट्रकमध्ये भीषण आपघात

एक ठार तर एकजण गंभीर
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई -पुणे एक्सप्रेसवर आडोशी बोगद्या दरम्यान ट्रकला पाठीमागून दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने भिषण आपघात सोमवारी रात्री १२.१५ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. आपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला असून सहकारी गंभीर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई -पुणे एक्सप्रेसवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच- 12-डीजी- 2021 या ट्रकला एमएच – 04- इवाय -8275 ने पाठीमागून धडक दिल्याने ट्रकचालक आयुब शाह (वय -60,रा-आकोला) यांच्या मृत्यु झाला आहे.तर सहकारी क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.

Exit mobile version