मुंबईच्या महापौरांना ‘ते’ धमकीचे पत्र उरणमधून

। उरण । वार्ताहर ।
मुबंई महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र दिले गेले आहे. त्यामध्ये अश्‍लील भाषा वापरत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकी पत्रामध्ये उरणमधील सायबर कॅफेची तपासणी उरण व भायखला पोलिसांनी केली आहे. पुढील तपास करीत आहेत. यामुळे उरणमध्ये खळबळ माजली आहे.
पनवेलमधून कुरिअरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्राच्यावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
विजेंद्र म्हात्रे असं पत्र पाठवणार्‍याचं नाव लिहिलं आहे. उरणचा पत्ता आहे. वकील खारच्या पत्त्यावर आहेत. पोस्टाचा शिक्का पनवेलचा आहे. पत्राचा पत्ता जुन्या घराचा आहे. संभ्रम करणारं पत्र आहे, असं महापौर यावेळी म्हणाल्या.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठविलेल्या धमकीच्या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या उरण येथील सायबर कॅफेचा शोध घेण्यासाठी मुंबई भायखळा पोलीस ठाणे व उरण पोलीस पथकाने उरण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेट एक्स्प्रेस या सायबर कॅफेची चौकशी केली. यावेळी धमकी पत्रामधील नाव अ‍ॅड. विजेंद्र म्हात्रे असे नाव आहे तर सायबर कॅफे मालकाचे नाव विजेंद्र शिंदे असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. सदर घटनेची गंभीर दखल घेऊन पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version