| पनवेल | राजेश डांगळे |
पनवेल शहरातील बापट वाड्यासमोर एका चिमुकलीने तिरंगा हातात घेऊन चक्क उंच दोरीवर उभे राहून कसरत केल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि दुसरीकडे धोकादायक परिस्थितीत सुरू असलेली ही कसरत लक्ष वेधून घेत आहे.
पनवेलमधील बापट वाड्यासमोरच्या परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा पडलेला दिसत असून, त्याच ठिकाणी लोखंडी खांबांच्या आधारे दोरी बांधण्यात आली आहे. या दोरीवर चिमुकली कसरत करताना दिसत असून, तिच्या हातात तिरंगा आहे. खाली राडारोडा आणि बाजूला सुरू असलेली वाहतूक पाहता तोल गेल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभक्तीचा उत्साह कौतुकास्पद असला तरी चिमुकल्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या कसरतींसाठी सुरक्षित जागा आणि आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दोरीवरची कसरत
