दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत दौरा

| अलिबाग | प्रतिनिधी |
 जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त भागातील वस्तुस्थिती व आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन याबाबत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अलिबाग तहसिलदार मीनल दळवी, नायब तहसिलदार अजित टोळकर, मंडल अधिकारी, तलाठी व इतर कर्मचार्‍यांनी दरडप्रवण भागाची पाहणी तसेच विस्थापित कुटुंबातील नागरिकांची विचारपूस करून पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनांबाबत अभ्यास केला.

महाड प्रांताधिकारी  प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद आणि पोलादपूर तहसिलदार श्रीमती दीप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा पार पडला.

Exit mobile version