अलिबाग-रेवस मार्गावर वाहनावर झाड कोसळले

सुदैवाने वाहनचालक बाल बाल बचावला

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यात आज मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग-रेवस मार्गावर चोंढीजवळील हॉटेल साईनजवळ सकाळी अकराच्या सुमारास वरसोली येथील उद्योजक नयन कवळे आपल्या चारचाकी वाहनाने एकटेच जात असताना त्यांच्या वाहनावर झाड पडून अपघात झाला. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड यांनी अपघात झाल्या झाल्या मित्रमंडळासह घटनास्थळी धाव घेत जेसीबी व इतर साहित्याने पडलेले झाड बाजूला करत वाहनचालकाची सुखरूप सुटका करून ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर आणली. यावेळी लायन्स क्लब मांडवाचे पदाधिकारी नितीन अधिकारी, सागर पाटील, सुबोध राऊत, दिनेश ठाकूर, धवल राऊत यांच्यासह रवी बेर्डे, नदीम भाई, रोशन नाईक, संतोष पाटील व वैद्य यांनी विशेष सहकार्य केले. घटनास्थळी मांडवा पोलीस यांनी देखील उपस्थित राहून सहकार्य केले.

Exit mobile version