बेकरेवाडी शाळेवर झाड कोसळले

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेकरेवाडी या आदिवासी वाडीमधील रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून त्या शाळेच्या इमारतीवर बुधवारी (दि.6) वादळात मोठे झाड कोसळले. कोसळलेल्या या झाडामुळे शाळेचे नुकसान झाले असून या आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यंना तात्पुरत्या स्वरूपात अन्य ठिकाणी बसून शिक्षण घ्यावे लागणार आहे.
माथेरान डोंगराच्या कुशीमध्ये वसलेल बेकरेवाडी हे एक लहानसे गाव आहे. बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट, वेगाने वारे वाहत होते.त्या वादळात रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरेवाडी या शाळेवर झाड कोसळले. त्यामुळे आता तेथील शाळेत शिक्षण घेणार्‍या इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आदिवासी मुलांना अन्य ठिकाणी बसून शिक्षण घावे लागणार आहे. दरम्यान शासनाने या घटनेकडून लक्ष देऊन शाळेच्या इमारतीवर कोसळलेले झाड बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Exit mobile version