बोरघाटात केमिकल ड्रम भरलेला ट्रक पलटी

। खोपोली । वार्ताहर ।
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गुरुवारी बोरघाटात अपकॉन कंपनी जवळ खोपोली एक्झिटजवळ अ‍ॅसिडने भरलेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले. या ट्रकमधील अ‍ॅसिडचे जवळपास तीन चार ड्रम लिकेज झाल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली होती मात्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले.त्यांनी परिस्थिती परीस्थित नियंत्रणात आणली.

बोरघाटात अपकॉन कंपनीचेनवीन लेन चे काम सुरू असून याठिकाणी अधून मधून लेन बंद होत असते त्यामुळे पुण्याबाजू कडून येणार्‍या वाहनांना अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत असतात. असाच अपघात पुण्याकडून मुंबईकडे ज्वलनशील केमिकल चे ड्रम घेऊन ट्रक निघाला होता. दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान खोपोली एक्झिटजवळ ट्रक आल्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली उतरून खोलगट भागात जाऊन अदळल्याने अपघात घडला.यातील ड्रम ट्रक च्या मधून बाहेर पडले मात्र यातील तीन ते चार ड्रम लिकेज झाल्याने केमिकल बाहेर पडले आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने काहीशी घबराट निर्माण झाली. मात्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बोरघाट वाहतूक पोलीस आय आर बी टीम डेल्टा फोर्स ,देवदूत टीम , अपघातग्रस्त टीम खोपोली पोलीस या ठिकाणी दाखल झाले. केमिकल ची आग असल्याने केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांना पाचारण केल्याने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी खोपोली अग्निशमक दलाचे वाहन व जवान ही उपस्थित होते

Exit mobile version