। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
पुण्याहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. हा भीषण अपघात मंगळवारी (दि.11) सकाळच्या दरम्यान घडला आहे. याप्रसंगी चालकाने उडी मारल्याने बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही तर मैद्याच्या गोणी रस्त्यावर पडल्याने काहीकाळ वाहतुकोंडी झाली होती.
मुंबई-पुणे महामार्गावरून सकाळच्या दरम्यान मद्याने भरलेला ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात होता. यावेळी बोरघाटात मॅकेनिक पॉईंटच्यावरती अंडा पॉइंटजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला.
यावेळी पुण्याकडे जाणारे एक ही वाहन समोरून येत नव्हते. त्यामुळे मोठा अपघात टळला; मात्र मैद्याच्या गोणी रस्त्यावर पडल्याने काहीकाळ वाहतुकोंडी झाली होती. घटनास्थळी महामार्ग पोलीस, आरआरबी कर्मचारी, डेल्टा फोर्स पोहचून मैद्याच्या गोणी काढून ट्रक बाजूला केला. यादरम्यान काहीकाळ वाहतुक फिरविण्यात आली होती.