गोरगरीबांशी बांधिलकी जपणारा सच्चा कार्यकर्ता

चित्रलेखा पाटील यांचे अवधूत पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अवधूत पाटील यांनी कमी वयात राजकीय व व्यवसायिक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी कमी कालावधीत निर्माण केली आहे. राजकारण व व्यावसायिक म्हणून काम करीत असताना सामाजिक बांधिलकीतून सेवा करण्याचा ध्यास त्यांच्यामध्ये आहे. समाजहितासाठी लढणारा शेकापचा सच्चा कार्यकर्ता आहे. गोरगरीबांशी बांधिलकी जपणारा कार्यकर्ता असून पक्षाच्या माध्यमातून त्यांना अशीच सेवा करण्याची संधी मिळावी, असे गौरवोद्गार शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अवधूत पाटील यांच्याबद्दल काढले.

अलिबाग अर्बन बँकेचे संचालक, कुरुळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अवधुत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुळमधील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप शुक्रवारी (दि.05) करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी माजी सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती, सुरेश पाटील, सत्कार मूर्ती अवधूत पाटील, संकीता पाटील, सरकारी वकील अ‍ॅड. सतिश नाईक, कुरुळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अ‍ॅड. मनोज ओव्हाळ, माजी सरपंच प्रकाश पाटील, अनिल पाटील, माजी सदस्य योगीता पाटील, वृषाली पाटील, अवधुत पाटील, अ‍ॅड. विजय पाटील, अ‍ॅड. योगेश पाटील, रमेश पाटील, ऋषीकांत कार्लेकर, प्रवीण कार्लेकर, अमित कार्लेकर, दिनेश पाटील, संतोष पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष रवी मगर, गौरू म्हात्रे, महेंद्र पाटील, सुधाकर पाटील, रविंद्र पाटील, रोहन पाटील, नितेश पाटील, अभिषेक घाडगे, महेश पाटील, अनुप पाटील, निहार पाटील, मनोहर पाटील, भालचंद्र पाटील, सुहास पाटील, आकाश पाटील आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सुधागड एज्युकेशन सोसायटीमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोेठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रलेखा पाटील म्हणाल्या, लहानपणीच वडीलांचे छत्र हरपले. अवधूत पाटील यांना त्यांच्या आईने दिलेल्या संस्कारातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. व्यवसायिक म्हणून काम करीत असताना शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली. आज अवधूत पाटील एक वेगळ्या उंचीवर पोहचले आहेत, त्याचा आनंद आहे. आपल्या कष्टाबरोबर स्वतःच्या जिद्दीतून स्वतःला घडविण्याचे काम त्यांनी केले. पण गरीबांशी बांधिलकी त्यांनी कायमच जपली आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

विविध सामाजिक उपक्रम
कुरुळ बस स्थानक येथे वृत्तपत्र वाचनालय
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व स्कूल बॅग
कुरूळमधील तलावावर खूली व्यायामशाळा
सुधागड एज्युकेशन सोसायटीमधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप
जय बजरंग व्यायाम शाळेत प्युरिफायर वाटप तसेच रंगकाम शुभारंभ
आदिवासी वाड्यांमध्ये ताडपत्री आणि रेनकोट वाटप
शेतकरी महिलांसाठी रेनकोट वाटप
गावात 25 एलईडी पथदिव्यांचा शुभारंभ
Exit mobile version