उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावरील खांब गावानाजिक रस्त्याच्या खाली उभ्या असणार्‍या ट्रेलरला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.20) रात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील खांब गावानजिक रस्त्याच्या खाली ट्रेलर (एच-46-बी- एफ-5339) उभा होता. यावेळी भरधाव येणार्‍या दुचाकीस्वाराने उभ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. विराट तिवारी असे दुचाकीस्वाराचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पनवेल येथील एम.जी.एम. हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. याचा अधिक तपास कोलाड पोलीस ठणे व पाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा शिर्के करीत आहेत.

Exit mobile version