पाली दिव्यांगांना अनोखी भेट

| सुधागड | वार्ताहर |

पाली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांनी पूर्ण वर्षभरात मिळालेले सर्व मानधन बुधवारी (दि.10) शहरातील तब्बल 80 दिव्यांग व्यक्तींना समप्रमाणात सुपूर्द करून त्यांना नवीन वर्षाची अनोखी भेट देऊन नवा आदर्श ठेवला आहे. पालीतील लिमये सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास शेकापचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, पाली सुधागड तहसिलदार उत्तम कुंभार, गटविकास अधिकारी लता मोहिते, अनुपम कुलकर्णी, संदेश शेवाळे, रविंद्र लिमये, सूरज शेळके, पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरूनकर, शैलेश सोनकर, सुधीर भालेराव, गणेश सावंत व सुलतान बेनसेकर, कल्याणी दपके, मधुरा वरंडे, व प्रतिक्षा पालांडे यांच्यासह हेमंत सिलिमकर, मोरेश्वर कांबळे, कपिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रविण खाडे, निशिकांत पाटील, विकास जाधव, सुबोध पालांडे, शशिकांत दंत, विठ्ठल दळवी, नितीन जाधव, विकास जाधव, राहुल ठोंबरे, मंगेश ठोंबरे तसेच पाली शहरातील दिव्यांग व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप काटकर यांनी केले.

Exit mobile version