पाताळगंगा नदी व पर्यावरण संवर्धन ट्रस्टचा अनोखा संकल्प

खालापूर न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपणातून शुभारंभ
। खोपोली । प्रतिनिधी ।

लोकसहभागातून पर्यावरणाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवून पाताळगंगा नदी व पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात पाच हजार वृक्षलागवड आणि संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्‍वस्त अरुण जाधव यांनी हा संकल्प केला असून, सोमवारी (दि.25) खालापूर न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण करुन त्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी कनिष्ठ न्यायाधीश प्रमोद माने, कनिष्ठ न्यायाधीश लता सकपाळ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रशीद भुसारी, अ‍ॅड. मुनिदास गायकवाड, अ‍ॅड. सत्यजीत वाडेकर, अ‍ॅड. जे.डी. पाटील, अ‍ॅड. मिलिंद सुरावरकर, अ‍ॅड. जयेश तावडे, अ‍ॅड. रवी राणावत यांच्यासह महिला वकील उपस्थित होत्या.

पातळगंगा नदी व पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आडोशी, सजगाव, माजगाव ग्रापंचयात हद्दीत पुढील आठवड्यात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती अरुण जाधव यांनी दिली.

Exit mobile version