। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर युवा वकील संघटनेच्या माध्यमातून नढाळ येथील नढाळ कालंबा मंदिराच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या 50 झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संवर्धन करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास माजी उपसरपंच रमेश पाटील, ग्रामस्थ मनोहर गायकवाड, हर्षल दळवी, नितीन ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. खालापूर युवा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. योगेश मानकवळे, अॅड. उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. सचिन चाळके, अॅड. राजू मोरे, अॅड. मिलिंद सुरावकर, अॅड. जयेश तावडे, अॅड. मिलिंद गायकवाड, अॅड.भगवान लाले आदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
खालापूर युवा वकील संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजहिताचे उपक्रम हाती घेत सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे. संघटनेच्या माध्यमातून असंख्य गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, 26 जून रोजी नढाळ येथील कालंबा मंदिराच्या आवारात जवळपास 50 वृक्षलागवड केल्याने युवा वकील संघटनेच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या वृक्षारोपण उपक्रमातून युवा वकील संघटनेचे सर्वांना जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले आहे.