| वावोशी | वार्ताहर |
‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील गोरठण बु. ग्रामपंचायत हद्दीतील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सोमवार, दि. 29 मार्च रोजी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी फिरत्या लोक अदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश एन.टी. घाडगे यांनी कक्ष न्यायाधीश म्हणून काम पाहिले, तर खालापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मानकावळे आणि ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. पद्मा पाटील यांची वकील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासमवेत अॅड. अभिजित बलकवडे, अॅड. महेश भद्रिके आणि अॅड. रमेश पाटील उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रलंबित दिवाणी, फौजदारी प्रकरणे अशी एकूण 60 वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यावेळी खालापूर न्यायालयातील कर्मचारी श्री. राठोड, श्री. हरणे, पोलीस अधिकारी जयेश कुटे आणि गोरठण बु. सरपंच विक्रांत पाटील, महेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील, ग्रा.पं. सदस्या सौ. झेमसे, ग्रामसेविका प्रतिमा खैरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.