गोमांसची वाहतूक करणारी गाडी ताब्यात

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमधील पळस्पे गावाजवळील पुलावर पनवेल शहर पोलिसांनी एका झायलो गाडीला थांबवून तिची तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्यामध्ये गोवंश जातीच्या चार बैलांची कत्तल केलेल मांस सापडले. हे मांस महाड येथून गोवंडी-मुंबई येथे गैरकायदेशीररित्या विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. यावेळी गाडीसह गोमांस असा एकूण 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

Exit mobile version