नाना टिळक शाळेत भरला आठवडा बाजार

ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

| वावोशी | वार्ताहर |

शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने वावोशी येथील नाना टिळक प्राथमिक शाळेने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे वावोशी ग्रामपंचायतीच्या दीपा शिर्के व जतिन मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबिर, मटकी, वांगी, पालक, मेथी, गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ, पाणी पुरी, वडा-पाव, सँडविच, बिस्कीट, इडली-सांबार, पाव भाजी असे बाजारात जे जे पदार्थ उपलब्ध होते. ते खरेदी करण्यासाठी पालकांनी एकच गर्दी केली होती. ग्राहकांनी देखील खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिला.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या घरत, मानसी केदारे, विद्या शेट्ये, रिया वालम, सुनील पवार, प्रवीण गाढवे, पालक तनुजा शिंदे, वेदिका मोरे, दीपा पवार, हेमांगी बामुगडे, संगिता पाटील, राजश्री कदम, राजश्री पाटील, उमेश पाटील, आनंद पाटील, अस्मिता पाटील, मोनिका कडम, ललित जंगम, अर्चना भंडारी, शितल अजगावकर, कालिदास जंगम, नैना जंगम आदी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version