गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

| गोंदिया | वृत्तसंस्था |

गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे एका 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही महिला पिठगिरणीत धान्य दळण्यासाठी आली होती.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धान्य दळत असताना अचानक महिलेच्या गळ्यातील ओढणी मशीनच्या पट्यात अडकली. त्यामुळे तिच्या गळ्याला फास बसला. या महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, घटना घडली तेव्हा तेथे कोणीही नव्हते. पिठगिरणी मशीनच्या पट्यात ओढणी अडकल्याने महिलेचा शीर कापले गेले आणि शरीरापासून धड वेगळे झाले. सदर घटनेमुळे नवेगावबांध परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आझाद चौकातील हर्षल उजवने यांची पिठगिरणी आहे. नीतु हर्षल उजवने असे मृत महिलेचे नाव असून त्या नेहमीप्रमाणे दळण दळण्यासाठी गिरणीवर आल्या होत्या. आज पिठगिरणीतच आपला मृत्यू लिहिलाय याची पुसटशीही कल्पना या महिलेच्या मनात नसेल आली. महिलेच्या इतका भयंकर पद्धतीने मृत्यू झाल्याने उजवने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती नवेगावबांध पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची चौकशी पोलीस निरीक्षक योगीता चाफले करीत आहेत.

Exit mobile version