कारच्या धडकेत सफाई कामगार महिलेचा मृत्यू

। पुणे । प्रतिनिधी ।

मुंढवा-खराडी रस्त्यावर कारने पदपथावरील गवत काढणाऱ्या सफाई कामगार महिलेला धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

महापालिकेत कंत्राटी पदावर सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या छाया मंगेश पेढारकर (39) या सोमवारी (दि.21) सकाळी अकराच्या सुमारास खराडीतील रस्त्यावर गवत काढण्याचे काम करत होत्या. त्याचवेळी एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. तसेच, पोलिसांनी कारचालक राजेंद्र ज्ञानोबा धुमाळ (52) याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version