| रेवदंडा | प्रतिनिधी |
बोर्ली येथे घरात घुसून महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली व तिचे मनात लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले. याबाबत महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिस ठाणे येथे तिघांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजणेच्या सुमारास महिला फिर्यादी या घरात एकटयाच असताना, तिघेजण घरात शिरले व त्यांनी त्यांचे मुलांची विचारणा केली. तसेच संगनमताने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून यामधील आरोपी क्रमांक एक यांने महिलेच्या डोक्यात काहीतरी जोरात मारून दुखापत केली व तिचे मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. याबाबत महिलेने तिघांचे विरोधात नोंदविलेल्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिस ठाणे येथे भादविकलम 354, 452, 324, 504, 34 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे दिनेश पिंपळे हे पो.नि. मुपडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.