तळा येथे नगराध्यक्षांकडून मारहाण

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील मंगल पारखे या महिलेला नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर आणि त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी दिवसा ढवळ्या हाताने लाथेने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

तळा शहरातील मंगल पारखे यांना आपल्या पगाराचे पैसे अद्यापही देण्यात आले नाहीत, म्हणून तळा नगरपंचायत येथे माहिती काढण्यासाठी गेल्या असता, त्याठिकाणी असलेल्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर व त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांनी तू पुन्हा नगरपंचायत कार्यालयात आलीस तर तुला ठार मारू, अशी धमकी देत हाताने व लाथेने पारखे यांना बेदम मारहाण केली. यामुळे सदर महिला भीतीच्या सावटाखाली वावरत असून नगराध्यक्षा व त्यांच्या पती कडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

यासंदर्भात नगराध्यक्ष यांचे पती यांना संपर्क केला असता त्यांनी मी नंतर फोन करतो असे सांगितले. नगराध्यक्ष यांच्या पतीने याआधी देखील पत्रकारांना धमकविण्याचे काम केले आहे. तळा शहरातील नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीच्या या दिवसा ढवळ्या मारहाणीच्या गुंड प्रवृत्तीमुळे शहरात गुंडाराज सुरू झालेले आहे की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.याबाबत नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर व त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांच्यावर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पीएसआय शिवराज खराडे हे करीत आहेत.

Exit mobile version