तरुण शेतकर्‍याचा स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग

| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यातील चांदई गावातील तरुण शेतकरी दीपक जनार्दन कोळंबे यांनी थंड हवेच्या भागात चांगले येणारी स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्लास्टिक डब्यामध्ये सातारा येथून आणलेली रोपे यांची लागवड करून कोणत्याही अनुभवा विना असा प्रयोग कोळंबे यांनी कृषी विभागाचे अधिकारी वर्गाचा सल्ला घेवून आणि आपली सहकारी ईशा मोरे यांच्या सोबतीने हे पीक घेतले आहे. दरम्यान,प्लास्टिक ड्रममध्ये कमीत कमी खर्चात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले असून यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्ट्रॉबेरी म्हटलं कि सर्वांना सातारा जिल्हा आणि महाबळेश्‍वर हि नाव समोर येतात. सातारा जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी तेथील हवामानाचा फायदा घेऊन स्टोबेरी शेत करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. मात्र कर्जत सारख्या उष्ण हवामान असलेल्या तालुक्यात स्ट्रॉबेरी होईल याचा विचार कोणी केला नसेल. पण प्रयोगशील शेती करण्याचा कोणताही अनुभव नसताना तालुक्यातील चांदईतील शेतकरी कोळंबे यांनी आपल्या जमिनीवर स्ट्रॉबेरी शेती करण्याचा निर्णय घेतला. स्ट्रॉबेरी लागवडसाठी त्यांना एमबीएचे शिक्षण घेतलेल्या इशा मोरे यांनी सहकार्य केले. त्यातून कर्जत तालुक्यात देखील स्ट्रॉबेरीचे चांगले पीक येऊ शकते हे सिद्ध झाले. महाबळेश्‍वर किंवा ठिकाणी स्ट्रॉबेरी शेती हि जमिनीवर वाफ्यांवर केली जाते.

मात्र दीपक कोळंबे यांनी मोरे यांच्या मदतीने अगदी वेगळी पद्धत स्ट्रॉबेरी लागवड आणि उत्पादन घेण्यासाठी अवलंबिली आहे. चांदई गावातील आपल्या जमिनीमध्ये हि लागवड करताना त्यांनी जमिनीवरील वाफ्यांवर नाही तर प्लास्टिक ड्रम मध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी भिवंडी येथून लिटर क्षमतेने झाकण असलेले प्लास्टिक ड्रम आणले. त्याआधी सातारा येथून स्ट्रॉबेरीची 2000 रोपे आणली आणि नंतर त्या ड्रममध्ये शेणखताचा थर, मातीचा थर अशी रचना करून त्या ड्रमला वेगवेगळ्या सहा ते आठ ठिकाणी अपेक्षित छिद्र पाडले. त्या छिद्रामध्ये कोलमबे यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली. साधारण नॉव्हेमबर 2022 मध्ये लागवड करून झाल्यावर महिन्यांनी स्ट्रॉबेरीच्या झाडांना फळे लगडली असून पहिले पीक या शेतीमधून घेण्यात आले आहे. त्याचवेळी आता त्या शेती मधून दुसरे उत्पन्न घेण्याची तयारी सुरु झाली आहे.

Exit mobile version