रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

| रायगड | वार्ताहर |

कोकण रेल्वेतून प्रवास करणार्‍या एका तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संकेत पांडुरंग गोठल (20) असे मृताचे नाव आहे. महाड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उंदेरी वाजेवाडी येथे ही घटना घडली. संकेत हा दिवा रत्नागिरी पॅसेंजरने खेड येथे जात होता. रेल्वे उंदेरी वाजेवाडी नजीक आली असता संकेतचा अचानक तोल जाऊन तो रेल्वेतून खाली पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version