। अलिबाग । प्रतिनिधी ।
गळफास घेऊन एका 41 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना बोडणी येथे रविवारी (दि.27) सकाळी घडली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कोळी (41) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बोडणी येथील समुद्रकिनारी मासळी सुकविण्याच्या खळ्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीवरील लोखंडी हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या संतोष याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून तो अगोदर मृत असल्याचे सांगितले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
बोडणी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
