कर्जतचा तरुण बनला कर्नल

मुंबई मोनोरेलमध्ये संजूची नियुक्ती

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील चांधई गावातील तरुण संजू सुदाम कोळंबे यांनी जिद्दीने मुंबई मोनोरेलमध्ये इच्छा पदावर नोकरी मिळविली आहे.

चांधई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेला संजू कोळंबे या तरुणाने आईवडिलांची मेहनत सफल करून दाखवली आहे. आई अंगणवाडी सेविका आणि वडील भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. अशा तुटपुंज्या आर्थिक कमाईवर मोठ्या पदावर नोकरी मिळवायची अशी जिद्दी संजू कोळंबे याने कायम ठेवली होती. प्राथमिक शिक्षण घेऊन कडाव येथील श्री गजानन माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतलेल्या संजूने पुढे आपल्या गावाच्या हद्दीत असलेल्या तासगावकर संस्थेत पॉलिटेक्निक पदविका शिक्षण घेतले. इथवर तो थांबला नाही, तर कर्जत येथील कोकण ज्ञानपीठमध्ये मेकॅनिकल इंजिनीयर ची पदवी 20190मध्ये पूर्ण केली. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याने अभियांत्रिकी मधील चांगल्या गुणांच्या जोरावर मारुती सुझुकी कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनिअर पदावर नोकरी सुरू केली. तेथे पाच वर्षे काम करीत असताना चांगला अनुभव गाठीशी मिळाल्याने स्पर्धा परीक्षा मध्ये धावपळ करीत असताना मुंबई मोनोरेलमध्ये कर्नलपदासाठी जाहिराती निघाल्या. तेथे मुलाखतीमध्ये 15 स्पर्धकांना मागे सारत पहिला क्रमांक पटकावला. संजू कोळंबे याच्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

Exit mobile version