| पेण | प्रतिनिधी |
मा. भारत निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार सर्व भारतभर निवडणूक ओळखपत्राला आधारकार्ड जोडणीचा कार्यक्रम चालू आहे. मात्र पेण तालुक्यातील शहरी भागामध्ये फक्त 9 टक्केंच मतदार ओळखपत्राला आधार लिंक झालेले आहे. उर्रवरीत 91 टक्के आधार लिंक बाकी आहे. तरी शहरी भागातील मतदारांनी लवकरात लवकर निवडणूक ओळखपत्राला आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केले.
तहसीलदारांच्या दालनात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शहरातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी पुढे डोईफोडे यांनी सांगितले की, आपणही वोटर हेल्प अॅप तसेच गरूडा अॅप व भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट किंवा हस्त लिखित नमुना 6 ब भरून आधार लिंक करू शकता. तहसील कार्यालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाकरिता बी.एल.ओ. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शनिवार, रविवारी पेण शहरातील प्रत्येक मतदार केंद्रावर बी.एल.ओ. असणार आहे. तरी ज्यांना ज्यांना आधार लिंक करायचा आहे त्यांनी बी.एल.ओ. करून नमुना 6 ब भरून द्यायचा आहे. असे सर्वांना सांगून आधार लिंक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाला मदत करण्याचे आवाहन देखील तहसिलदारांनी केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक पांडूरंग जाधव, नगरसेविका प्रतिभा जाधव, .तेजस्विनी नेने, नगरसेवक निवृत्ती पाटील, संतोष पाटील, नरेंद्रभाई पाटील, विवेक जोशी, पेण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रविण पाटील, धिरेंद्र गुरखा, संदीप सुर्वे, यांच्यासह नायब तहसिलदार नितीन परदेशी, नायब तहसिलदार सुरेश थळे, अदी उपस्थित होते.