आम आदमी पार्टीचे जन आक्रोश आंदोलन

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
महावितरणकडून लॉकडाऊन काळात 1 एप्रिल 2020 पासून 20 टक्के वीज दर वाढ करण्यात आली होती. संपूर्ण देशात महागडी वीज महाराष्ट्र राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे व तसेच मागील काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात सुध्दा वाढ करण्यात आली आहे. या विरोधात गुरुवार (13) रोजी सकाळी 10:00 वा. बल्लालेश्‍वर मंदिर पाली ते महावितरण कार्यालय पाली पर्यंत आम आदमी पार्टी सुधागड तर्फे जन आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवार (03) एप्रिलपासून गावोगावी जाऊन वीज बील वाढ प्रश्‍नावर जनतेशी संवाद साधणार आहेत. व जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत.

महागाईचा आगडोंब उसळला आहे. जनता महागाईने होरपळून निघाली आहे. अशातच वीजबिल व घरगुती गॅस वाढ होणार असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनता जगावे की मरावे या द्विधा मनस्थितीत आहे. महागाईने महिलां प्रचंड त्रस्त आहेत. घराचे आर्थिक गणित बिघडले आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी सुधागड यांच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन पुकारण्यात येत आहे. व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हरिचन्द्र शिंदे व अशोक रायकर यांनी केले आहे.

Exit mobile version