शहापूरचा आराध्य ‌‘स्वामी समर्थ’ मालिकेत

कलर्स मराठीवर रोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला

| भाकरवड | जीवन पाटील |

अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावचा सुपुत्र बालकलाकार आराध्य समीर पाटील याने श्री स्वामी समर्थ मालिकेमध्ये झळकणार आहे. ही मालिका कलर्स मराठीवर रोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आराध्यने या मालिकेत ‌‘देवेश’ची भूमिका साकारली आहे. आराध्य हा कोएसो ना.ना. पाटील हायस्कूल, पोयनाडचा विद्यार्थी आहे.

आराध्यने आतापर्यंत एकपात्री राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तीन वर्षांत जवळजवळ प्रथम व द्वितीय क्रमांकाची 30 बक्षिसे पटकावली असून, राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत खारेपाटातील राज्य शासनाचा उत्कृष्ट बाल अभिनेता हा पुरस्कार प्राप्त करणारा पहिला बालकलाकार म्हणून तो नावारूपाला आला आहे.
आराध्य हा सचिन धुमाळ म्युझिकल अकॅडमीकडून रायगड जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये झालेल्या विनामूल्य बासरी वादन कार्यक्रमातसुद्धा सहभाग घेऊन त्याने योगदान दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रात शाळेंतर्गत होणाऱ्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व व गायन स्पर्धेत दरवर्षी प्रथम क्रमांक प्राप्त, इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमध्ये रायगड जिल्ह्यात गुणवत्ता यादीत अकरावा, तर अलिबाग तालुक्यातून मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आराध्य हा उत्कृष्ट बासरी, माऊथ ऑर्गन, आदी वाद्यांमध्येसुद्धा आराध्य प्राविण्य आहे.

आराध्य हा सचिन धुमाळ म्युझिकल अकॅडमीकडून रायगड जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये झालेल्या विनामूल्य बासरी वादन कार्यक्रमातसुद्धा सहभाग घेऊन योगदान दिला आहे. शैक्षणिक क्षेत्रात शाळेअंतर्गत होणाऱ्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वकृत्व व गायन स्पर्धेतरी, दरवर्षी प्रथम क्रमांक प्राप्त, इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमध्ये रायगड जिल्ह्यात गुणवत्ता यादीत अकरावा, अलिबाग तालुक्यातून मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आराध्य हा उत्कृष्ट बासरी, माउथ ऑर्गन आदी वाद्यांमध्ये सुद्धा आराध्य प्राविण्य आहे.

दरम्यान, स्वामी समर्थ मालिकेचे डायरेक्टर दिगंबर फराटे, प्रोडूसर राकेश सारंग, संगीता सारंग, प्रोडक्शन : कॉम्सक्लब स्टुडिओ चॅनल:- कलर्स मराठी लीड, ॲक्टर :- अक्षय मुडवाडकर, शूटिंग लोकेशन :- मड जेट्टीवर शूट करण्यात आले आहेत. अप्रतिम सिरीयल आणि प्रोडक्शन डायरेक्टर, ॲक्टर यांनी सगळ्यांनीच छान ट्रीटमेंट सेटवर दिली आणि उत्तमची कलाकारांची काळजी घेतली गेली. संपूर्ण टीमसोबत काम करायला मिळाले.

कौतुकाचा वर्षाव
आराध्य पाटील हा अलिबाग शहाबाजमध्ये राहणारा तरुण असून, त्याची ही पहिलीच मालिका आहे. मुळात, पहिली मालिका आणि मोठा ट्रॅक स्वामींच्या सीरियलमध्ये मिळाल्यामुळे आनंद खूपच झाला आणि त्यात आपल्या पेण तालुक्यातील शिर्की येथील सिनेकलाकार अर्चना पाटील जिने आत्तापर्यंत 45 सीरियल क्रॉस केल्या, तिच्यासोबत काम करायला मिळाले याचाही आनंद झाला असे, मत आराध्यने सांगितले. या सर्वांचे श्रेय आराध्य आपल्या गुरुजनांना, आई-वडिलांना देत आहे.
Exit mobile version