। उरण । वार्ताहर ।
ठाणे येथे राज्यस्तरीय अबेकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत राज्यातील सुमारे शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उरण येथील दयांशी कल्पेश पाटील हया विद्यार्थानीने संपूर्ण देशामधील अॅबेकसस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर राज्यस्तरीय स्पर्धेत अंबर शिगवन द्वितीय क्रमांक, भक्ती चव्हाण तृतीय क्रमांक, वेदांत म्हात्रे, रेयांश लाटे यांना उत्तेजनार्थ बक्षीसे मिळाली. मास्टर ब्रेन डेव्हलपर्स हे गेल्या 15 वर्षापासून जेएनपीटी येथे अॅबेकसचे वर्ग आहेत. अॅबेकस हे वयाच्या 5 मे 13 वर्षापर्यंत विद्यार्थिनी करीता आपल्या सर्वांगिक विकास करण्याकरीता हा कोर्स फार उपयुक्त आहे. अॅबेकसच्या शिक्षणामुळे मुलांमध्ये एकाग्रता, क्रीयेटीव्हीटी, क्षमता असे अनेक गुणीचा विकास होतो. विद्यार्थाना महाविद्यालय शिक्षणा मध्ये येणार्या अनेक स्पर्धात्मक परिक्षेसाठी हा कोर्स फार उपयोगात होते.







