| उरण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळा चिरनेर येथे बुधवारी बाल आनंद मेळावा आणि खाद्य जत्रा अत्यंत उत्साहात संपन्न झाली.पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक जोड देत विद्यार्थ्यांनी स्वतः विविध पदार्थांचे स्टॉल्स मांडून आपल्यातील भावी उद्योजकाची झलक दाखवून दिली. या मेळाव्यात एकूण 195 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ग्रामस्थांची मने जिंकली. चिरनेर केंद्राचे केंद्रप्रमुख दर्शन पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष सचिन म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारती ठाकूर, बापू मोकल, निलेश ठाकूर, संग्राम ठाकूर, बी.जे.म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, संजय पाटील, अरुण ठाकूर, समाधान म्हात्रे, अशोक कांबळे, हिम्मत केणी, दामोदर केणी, प्रवीण म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य आणि सदस्या ,सर्व शिक्षकवृंद शाळेची मदतनीस सौ. रंजना म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी लावलेल्या 60 स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यावर स्टॉल्स प्रमुख आकर्षण चिकन बिर्याणी, उकडीचे मोदक, पाव भाजी, चिकन पकोडा, समोसा, दूध मलाई, इडली, पॉपकॉर्न आणि फ्रेंच फ्राईज,गोड व थंड पदार्थ कप केक, फ्रुट मेजवानी, गुलाबजाम, फ्रुटी मिल्कशेक, आणि गाजर हलवा,पौष्टिक आहार यासोबतच मेळाव्यात परिसरातील ताज्या पालेभाज्यांचे स्टॉल्स लावून पौष्टिक आहाराचा संदेश देण्यात आला. यावेळी शिक्षक नेते निर्भय म्हात्रे सरांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.







