| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलिसांनी सोसायटी नाका ब्रिजच्या खाली टाकलेल्या छाप्यात हजारो रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ हस्तगत केला असून या प्रकरणी एका इसमास ताब्यात घेतले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शाकिर पटेल, प्रवीण फडतरे, सुनील वाघ, पो उपनिरीक्षक देवकाते, नामदेव पडळकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी हिमानल्लू सोमनाथ गंठेपागू ( वय 35 ) या रिक्षा चालकाकडे ताबेकब्जात 416 ग्रॅम वजनाचा एकुण अंदाजे 21,000 रू. किंमतीचा मगांजाफ हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात बेकायदेशिररित्या बाळगले स्थितीत असताना मिळुन आला म्हणुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.







