| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावमधून एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना बुधवार (दि.3) रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील फिर्यादी महिला यांची 17 वर्षाची अपरहित मुलगी तिचे वर्णन उंची अंदाजे 5 फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस लांब, अंगात नेसूस निळ्या रंगाचा ड्रेस व गुलाबी रंगाची लेगीज, पायात काळ्या रंगाचे बूट घारले आहेत. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा अधिक राजेंद्र पाटील व श्री. पवार हे करीत आहेत.