| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील क्रांतीनगर येथील पुलावजवळून एका अल्पवयीन 16 वर्षीय मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना मंगळवार (दि.15) दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, यातील अज्ञात आरोपी याने पीडित मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन फूस लावून तिचे अपहरण केले. या अपहरित मुलगी वय- 16 वर्ष, अंगाने सडपातळ, उंची 4 फूट, रंग सावळा,अंगात नेसूस केसरी रंगाचा टीशर्ट, आर्मी रंगाची पॅन्ट, नाकात सोन्याची चमकी, पायामधे काळ्या रंगाची सॅन्डल असे आहे.
या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत.