सत्तारांची जीभ घसरली;सुप्रिया सुळेंना केली शिवीगाळ

। मुंबई । प्रतिनिधी ।
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी 24 तासांत माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना दिला आला आहे.

]सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात.

सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी आक्षेपार्ह भाषेत सुळे यांच्यावर टीका केली.यावर आता मी यावर भाष्य करणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सत्तारांच्या घरावर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक भडकले आहेत. संतप्त कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या घरात घुसले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे गंभीर पडसाद उमटल्याचे पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने मुंबईत तणावाचे वातावरण आहे.

मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. आमच्यामध्ये भांडण लावू नका. मी कोणत्याही महिलेला बोललो नाही. कोणत्याही महिलेचे मन दुखले असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. पण जर आमच्याबद्दल कोणी खोके नावाचा आरोप लावत असेल त्यांच्याबद्दल मी जे काही बोललो ती आमच्याकडील ग्रामीण भाषा आहे. महिलांबद्दल मी एक शब्दही बोललो नाही.

अब्दुल सत्तार,कृषी मंत्री

Exit mobile version