कुस्ती स्पर्धेत अभिनव प्रशालेचे यश

| नेरळ । वार्ताहर ।

मुंबई विद्यापीठ क्रीडा मंडळ आणि केएमसी महाविद्यालय खोपोली आयोजित आंतर महाविद्यालयीन कोकण विभाग कुस्ती स्पर्धा नुकतीच केएमसी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खोपोली, रायगड येथे झाली. या स्पर्धेत अभिनव ज्ञान मंदिर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कर्जतची भूमिका किरण खंडागळे हिने 50 किलो या गटात कांस्यपदकाची कमाई केली.

या स्पर्धेचे डॉ. मोहन आमृळे डॉ. जयवंत माने के.एम.सी. कॉलेज, खोपोली यांनी नियोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी स्पर्धक पुरुष व महिला स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन डॉ.जयवंत माने व तसेच क्रीडा विभाग मुंबई विद्यापीठ येथून आलेले पंच यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जयवंत माने यांनी केले.

या स्पर्धेत अभिनव ज्ञान मंदिर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कर्जत येथील महिला गटातून 50 किलो या गटातून भूमिका किरण खंडागळे या स्पर्धकाला कांस्य पदक व प्रमाणपत्र डॉ. जयवंत माने यांच्याकडून प्रदान करण्यात आले. या विद्यार्थीनीस मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. गणेश पाटील, प्रा. मंदार लेले, प्रा. प्रशांत दळवी, प्रा. अंजली शर्मा या सर्वांनी मोलाची भूमिका पार पडली. अभिनव मंदिर संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य आणि सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण घोडविंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

Exit mobile version