विज्ञान प्रदर्शनात ‌‘अभिनव’ची बाजी

| माणगाव | प्रतिनिधी |

21 वे तळा तालुका विज्ञान प्रदर्शन गो.म. वेदक विद्यालय, तळा येथे 3 जानेवारी रोजी ऑनलाइन प्रतिकृती व वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द, ता. तळा अव्वल ठरली आहे.

प्रशालेने एकूण पाच बक्षिसे मिळवली. यामध्ये रिया अशोक शिंदे- उच्च प्राथमिक गट विज्ञान प्रतिकृती द्वितीय क्रमांक, प्रश्नमंजुषा द्वितीय क्रमांक माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात रुची संतोष गुजर- प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक, संतोष बळीराम घाग प्रयोगशाळा परिचर शैक्षणिक निर्मिती प्रथम क्रमांक, राजेंद्र चंद्रकांत भगत माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रथम क्रमांक प्राप्त केला. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देशमुख, गटशिक्षणाधिकारी तांबट, विस्ताराधिकारी ठाकूर उपस्थित होते. या प्रतिकृतींचे परीक्षण विद्याधर जोशी, बिराडी बोरली ज्युनिअर कॉलेज श्रीवर्धन यांनी केले. बक्षीसपात्र विद्यार्थी, शिक्षक व प्रयोगशाळा परिचारक यांचे संस्था पदाधिकारी व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version