भीमसैनिकांवरील गुन्हे तात्काळ रद्द करा

ऑल इंडिया पँथरचे तहसीलदार, पोलिसांना निवेदन
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

भीमा कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्रभर हजारो भीमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे स्वतंत्र जीआर काढून तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली. तसेच तामसा, जि. नांदेड येथील भीमसैनिकांची निर्दोष मुक्तता करणे व अनुसूचित जाती जमातींशी निगडित आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व इतर मागण्यांबाबत पाली सुधागडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या नेतृत्वात सुधागड तालुकाध्यक्ष संदेश भालेराव यांच्या उपस्थितीत पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार व पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईनगडे यांना शुक्रवारी (29) निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी यांनादेखील देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष नरेश दादा गायकवाड, तालुकाध्यक्ष संदेश भालेराव, उपाध्यक्ष रमेश गायकवाड, आरोही गायकवाड, सारिका गायकवाड, अशोक गायकवाड, साजन शिंदे, आवेश भालेराव, रोहित भालेराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version