विवाहित महिलेवर अत्याचार

महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील कोथेरी गावातील एका विवाहित महिलेवर बलात्कार करत तिचा मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ क्लीप काढत ती व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्यचार करणार्‍या तीन आरोपींच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पीडित महिलेचा पती आजारी असल्याने काचले येथील काशिनाथ कृष्णा पवार आणि आशा काशिनाथ पवार यांनी पतीवर कोणीतरी करणी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या अंगावरून तांदूळ काढून फेकून देत तेथून ते निघून गेले. मात्र, त्यानंतर आरोपी काशिनाथ हा पुन्हा पीडित महिलेच्या घरी आला आणि कागदाच्या पुडीत आणलेली पावडर आजारी पतीला पाण्यातून दिली. यामुळे पीडितेच्या पतीला गुंगी आली. आरोपी काशिनाथ याने यावेळी पीडितेच्या इच्छेविरोधात बळजबरीने अत्याचार केला. आरोपीने पीडितेचे व्हिडिओ क्लीप आणि फोटो काढत व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला आणि तिच्याकडून सुमारे 12,00,000 रुपये धमकी देऊन घेतले. ही घटना मे 2016 ते सप्टेंबर 2021 या दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने काशिनाथ कृष्णा पवार, आशा काशिनाथ पवार, अभी काशिनाथ पवार, सर्व राहणार काचले महाड, सध्या राहणार चेंबूर मुंबई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस पांडुरंग कापडेकर हे करीत आहेत.

Exit mobile version