| पनवेल | वार्ताहर |
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी सदर तरुणाविरोधात बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडित मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा सीबीडी येथे राहण्यास असून, पीडित मुलीच्या मैत्रिणीने काही दिवसांपूर्वी तिची ओळख आरोपीसोबत करून दिली होती. त्यानंतर आरोपी हा पीडितेच्या पाठीमागे लागला होता. अशाच प्रकारे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगी राहात असलेल्या इमारतीजवळ गेला. यावेळी त्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीवर जाऊन पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार करून पलायन केले.







