| पनवेल | वार्ताहर |
शिवीगाळ करून स्टीलच्या पाण्याची बाटली आणि पीव्हीसी पाईपने मारहाण केल्या प्रकरणी रमजान फिरोज खान, जावेद रशीद शेख, आणि आलम खान यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलाल अहमद हा तळोजा फेस वन येथे राहतो. तो आणि त्याचा भाऊ राशीद अहमद हे मार्केटमधून इमारतीच्या लिफ्टजवळ आले. यावेळी इमारतीत राहणारे रमजान खान, आलम खान व जावेद शेख हे दुसरा भाऊ मोहम्मद फैसलला दमदाटी करत असल्याचे दिसून आले. याची विचारणा केली असता त्यांनी बिलाल आणि राशीद याला देखील शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी रमजान खान याने स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी गेले तर आलम खान याने तेथे पडलेल्या पीव्हीसी पाईपने हातापायावर मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी बहीण आयेशा बानो हिने मध्यस्थी केली असता तिला आणि सोबतचा भाऊ राशीद याला आणि मोहम्मद शहा फैसल यांना देखील हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर बिलाल याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले.







